preloader
about
about about

मंदिराचा इतिहास

श्री देव एकनाथ देवस्थान इतिहास

श्री देव एकनाथ मंदिराला एक मनोरंजक इतिहास आहे. हर्णैमध्ये फार वर्षांपूर्वी कै. गैलाड नावाचे एक संतप्रवृत्त नाथभक्त राहत असत. एकदा त्यांचे स्वप्नात श्री एकनाथ महाराज आले व त्यांनी मी हर्णैत येणार आहे, तर तू पंढरपूरला ये व मला घेऊन जा असा दृष्टांत दिला.
लगेच श्री. गैलाड पंढरपूरला गेले. तेथे गेल्यावर मात्र पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर ते तेथेच रमून गेले. आध्यात्मिक प्रवृत्ती स्थिरावून ते तेथेच रंगले व नाथांचा दृष्टांत विसरले. नाथांनी त्यांना पुन्हा त्यांचे स्वप्नात येऊन आठवण केली व पादुका कोठे आहेत हेही सांगितले. त्यामुळे मात्र श्री. गैलाड चंद्रभागेत पोहचले व पादुका घेऊन हर्णैस परतले. तो मोठा भाग्याचा दिवस होता. ग्रामस्थांनी त्यांच्या परीने आनंद सोहळा साजरा केला व एका केमळी झोपडीत नाथ पादुकांची स्थापना केली. गावात श्री नाथ महाराजांचे स्थान निर्माण झाले. तेथेच ग्रामस्थ पुजा, आरती, कथा, प्रवचन करू लागले. याचवेळी नाथांनी पैठण येथील भक्त मंडळींसही दृशांत दिला. नाथ महाराज हर्णै येथे वास्तव्यास गेले असल्याने भक्तमंडळी पैठणहून हर्णै येथे आली...

पुढे वाचा

मुख्य पाने

विश्वस्त मंडळ

मंदिराचा कारभार स्वखुशीने काही मंडळी पाहतात. ते खात्रीशीर रित्या सर्व उत्सव आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील याची खबरदारी घेतात.